दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात काल, पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी बैठक झाली. दुपारी १ च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक, तब्बल ४ तास चालली असून, भाजपविरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी, यूपीएच्या बॅनरखाली एकत्र न येता, राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर, या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समजतं आहे.
हे पण वाचा, विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
तसेच, आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठकदेखील, ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीआधी झाली असून, या बैठकीला केरळमधील राष्ट्रवादीचे नेते पी. सी. चाको, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते. त्यानंतर आज दु. ४ वा. पवारांच्या निवासस्थानी या नवीन आघाडीच्या दृष्टीने एक महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे, या बैठक सत्रांमागे कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Delhi: TMC leader Yashwant Sinha, Lyricist Javed Akhtar, Rashtriya Lokdal President Jayant Chaudhary and National Conference leader Omar Abdullah arrive at the residence of NCP chief Sharad Pawar. pic.twitter.com/ThoG8Y04G5
— ANI (@ANI) June 22, 2021
हे पण वाचा, खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
दरम्यान, यूपीएला अपयश आल्याने, ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली काँग्रेस-भाजप विरोधी पक्ष एक आल्यास, भाजप आणि काँग्रेसला देखील धक्का देणं सोपं जाईल आणि या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने, ‘राष्टमंच’ नावानं नवी आघाडी उघडण्यावर, या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी यशवंत सिंन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी. राजा, फारुख अब्दुला, जस्टीस ए. पी. शाह, जावेद अखतर, के सी तुलसी, करन थापर, आशुतोष, माजीद मेमन, वंदना चव्हाण, एस वाय कुरेशी उपस्थित राहणार असल्याचं काळात असून, त्यामुळे देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे आणि राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे.
हे पण वाचा, उच्च न्यायालायने पोलीस आयुक्तांना दिले, संजय राऊत यांच्या चौकशीचे आदेश
तसेच, राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, गीतकार जावेद अख्तर, प्रीतीश नंदी, ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्वीज, करण थापर आणि आशुतोष या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
Read Also :
- महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका
- हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
- मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही – बच्चू कडू