कोरोना संकटकाळ आणि ऊन-पावसाच्या या आजारी पडण्याच्या वातावरणात प्रतिकारशक्ती (Immune System) मजबूत असणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या या काळात अनेक बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे कमजोर पडलेली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आवश्यक असतात. आज आपण अशाच प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या काढ्याबाबत माहिती घेणार आहोत.
हा आयुर्वेदिक आणि आरोग्यासाठी लाभदायक असणारा काढा बनवण्यासाठी आपल्याला वेलदोडा (हिरवा किंवा काळा), कच्ची हळद, लवंग, काळे मिरे, दालचिनी, आलं (अद्रक), मध किंवा गूळ आणि तुळस यांची आवश्यकता आहे.
काढा बनवण्यासाठी हळद आणि आलं चांगलं कुटून घ्या गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवा. उकळलेल्या पाण्यात वेलदोडा (हिरवा किंवा काळा), कच्ची हळद, लवंग, काळे मिरे, दालचिनी, आलं (अद्रक), मनुके आणि तुळस असे सर्व मसाले टाका आणि 20 ते 30 मिनिटं चांगले उकळू द्या. जवळपास अर्ध्या तासानंतर काढ्याचा रंग विटकरी झाला की यात गूळ किंवा मध टाका आणि सेवन करा