मुंबई : शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मोदींना हिंदुह्यदयसम्राट व्हायचे आहे. पण हिंदुह्यदयसम्राट एकच व ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. जनतेने त्यांना ही पदवी दिली होती. हिंदुह्यदयसम्राट होता येत नाही ही तर त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेना फोडली. त्याच शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र वापरून मते मागण्याची वेळ भाजप आणि मोदी यांच्यावर आली.” असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बीकेतीस इंडिया आघाडीची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा..कॉंग्रेसकडून व्होट जिहाद, वर्षा गायकवाडांनी फडणवीसांना सुनावलं, म्हणाल्या…
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गेल्या १० वर्षांत काय केले? हे सांगण्यासाठी भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्यावर असे मुद्दे उकरून काढण्याची भाजपला सवयच आहे. आमच्यावर ‘व्होट जिहाद’चा आरोप केला जातो. पण भाजपकडून ‘व्होट गद्दार’ केले जाते त्याचे काय? असा खोचक सवालही ठाकरेंनी केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ‘नकली संघ’ म्हणण्यास कमी करणार नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा..भुजबळांनी नाराजी ? गिरीश महाजन नाशकात दाखल, मतदानाच्या आधीच नाशकाच काय घडतंय ?
शिवसेना मुस्लिमांचा अनुनय करते, अशी टीका भाजपचे नेते करतात. मला कधी मुस्लिमांच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्याचा अनुभव नाही. पण ‘आपले बालपण मुस्लीम कुटुंबात गेले’, असे मोदीच सांगतात. त्यांच्या ताटात जेवायचे मग त्यांनी गोवंश हत्याबंदी कशी केली, हे माहीत नाही. असेही ते म्हणाले.
दरम्यान, हुकूमशहाची नजर कशी राक्षसी असते? त्याचा अनुभव लोकांनी घेतला. या हुकूमशहाचा विषाणू पासून देशाला वाचवायचे आहे. ४ जूनला मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार. असा विश्वास व्यक्त करत हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, मोदी-शहा-अदानीचा होऊ देणार नाही. नाशिकच्या सभेत मोदी हिंदू-मुस्लीम भाषा करू लागले, त्यावेळी एक शेतकरी उभा राहून म्हणाला कांद्यावर बोला. त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला मोदी उत्तर देऊ शकले नाहीत. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
READ ALSO :
हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको”
हेही वाचा…“तर जय श्रीराम शिवाय यांना काहीच सुचत नाही”, जयंत पाटलांचा खोचक टोला
हेही वाचा…भाजपच्या या सहा राज्यात कमी होणार जागा, भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही
हेही वाचा..“मोदींना आता ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीलाही प्रचाराला बोलवा”