अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा, राम मंदिर ट्रस्ट घोटाळा : सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
हे पण वाचा, ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
दरम्यान, दुसरीकडे आता हे सर्व आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत फेटाळले असून, ‘सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून बाग बिजेरची जमीन खरेदी केली होती. तेव्हा या जमिनीचा दर २ कोटी रुपये होता. तसेच, याची नोंद देखील तेव्हा करण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी मंदिराने ही जमीन विकत घेतली. तेव्हा सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी आजच्या बाजार भावाने दर निश्चित केले आणि त्यानुसार ती जमीन मंदिर ट्रस्टला विकली,’ असे म्हणणे मांडले आहे.
क्या आप राजनैतिक व्यक्ति हैं? अगर नहीं तो आपका किससे राजनैतिक विद्वेष? पाप छिपाने के लिए राजनीति के पीछे मत छिपिये। भगवान श्रीराम और उनके भक्तों के चरणों में गिरकर क्षमा मांगिए, पश्चाताप कीजिए। चंदा चोरी के पैसे लौटाइए और पुलिस में आत्मसमर्पण कीजिए।#RamMandirScam https://t.co/orXX84mlIx
— Deepak Bajpai (@BajpaiDeepak) June 13, 2021
त्यामुळे, सध्या जे कथित आरोप केले जात आहेत, ते केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी केले जात असून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचेही चंपतराय यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यात उडी घेतली असून, याबाबत ट्रस्ट आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा. या प्रकरणामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली असून, मोहन भागवतांसोबचत, विश्व हिंदू परिषेदच्या नेत्यांनी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जे समोर आलं आहे त्यात तथ्य आहे की नाही, याचा खुलासा करणं गरजेचं आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Also :
- सेनेकडून सत्तेसाठी हिंदुत्वास काळीमा फासण्याचे काम; प्रविण दरेकरांची टीका
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?
- ‘…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल’
- ‘काँग्रेस नेत्यांकडे काका-पुतण्यांसमोर मान हलवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही’
- ‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज राजभवनात सुनावणी होणार