मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात आता महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यातच काल महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मुंबईत जाहीर सभा पार पडल्या. या सभांमधून दोन्ही बाजूंनी चांगलीच टोलेबाजी झाली. यावरून शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आम्हा लोकांबद्दल तुम्ही बोललात, की महाराष्ट्रात कोणी भटकती आत्मा आहे. आत्मा हा माणूस गेल्यानंतर असतो. त्यांना चिंता पडली आम्हा लोकांची, पण मी एवढंच सांगतो की हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे जे करावे लागेल, ते करायची ताकद तुम्हा सगळ्यांच्या मदतीने आमच्याकडे आहे. त्याची पूर्ण उपयुक्तता आमच्याकडून केली जाईल.
हेही वाचा..कॉंग्रेसकडून व्होट जिहाद, वर्षा गायकवाडांनी फडणवीसांना सुनावलं, म्हणाल्या…
लोकशाही संकटात आहे. संविधान संकटात आहे. महाराष्ट्राचे हित संकटात आहे. या सगळ्यातून सुटका करण्यासाठी आपल्याला एकत्र रहावे लागेल. कोणी काही म्हटले तरी आज महाराष्ट्रात जे महत्त्वाचे पक्ष एकत्र आले, त्या ऐक्याच्या जोरावर आणि तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर या निवडणुका प्रक्रियेत भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करणे, हे तुमचे आणि माझे काम आहे. मुंबई शहराच्या निवडणुका ज्या २ दिवसावर आल्या आहेत, त्या निवडणूकीचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्या, आणि उत्तम प्रकारे याठिकाणी भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेनेबद्दल नकली सेना म्हणाले. ज्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्या संकटाच्या काळात तुम्हाला वाचवण्याचे काम केले, हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण तुम्ही विसरलात. तुम्ही काहीही म्हणालात, कितीही टिकाटिप्पणी केली तरी राज्यातील कानाकोपऱ्यातला तरुण आणि मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार जो आज उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत, त्याच्यामागे शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कितीही टिकाटिप्पणी केली, तरी त्याच्याकडे या राज्याचा सामान्य माणूस ढुंकूनही बघणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा..“या हुकूमशहाचा विषाणूपासून देशाला वाचवायचे आहे”, ठाकरेंचा मोदींवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको”
हेही वाचा…“तर जय श्रीराम शिवाय यांना काहीच सुचत नाही”, जयंत पाटलांचा खोचक टोला
हेही वाचा…भाजपच्या या सहा राज्यात कमी होणार जागा, भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही
हेही वाचा..“मोदींना आता ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीलाही प्रचाराला बोलवा”