मुंबई : राज्यात सकारात्मक विरोधी पक्ष असावा अशी अपेक्षा आहे. ज्याठिकाणी आम्ही चुकत असू, जनसेवेची कामं करताना मागे पडत असू, वेग कमी असेल तिथे विरोधकांनी भाष्य केलं पाहिजे. पण अडीच वर्ष सत्ता असताना ज्या गोष्टींबद्दल जे निर्णयच करू शकले नाहीत. त्याबद्दल आज त्यांनी आम्हाला तत्वज्ञान सांगू नये. असा टोला वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला लगावला.
“खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अलीकडेच करण्यात आला. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात न आल्यामुळे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू करण्यास अडचणी येत होत्या. पुढील दोन दिवसापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनला सुरूवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुनगंटीवार बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या काळातील पहिलेच अधिवेशन असल्याने विरोधक शिंदे सरकारला अडचणी आणण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की आहे.
“मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपने सर्वात महत्वाची खाती आपल्या ताब्यात घेतली. तर शिंदे गटातील मंत्र्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे .त्यावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेकडे जी खाती होती ती त्यांच्याकडे आहेत. भाजपाने चांगली खाती घेतली असं म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपकडे जी खाती आहेत. ती शिवसेनेने विचारपुर्वक, चिंतन करून काॅंग्रेस, राष्ट्रवादीला दिलेली खाती आहेत. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते आणि सध्या आम्ही आहोत. शिवसेनेने यावर टिका करणं म्हणजे आपल्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही म्हणत निंदा करून घेण्यासारखं आहे. असं ते म्हणाले.
नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक विभागाचं खात आल्यानंतर त्यांनी सुरूवातीलाच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालय तसेच इतर ठिकाणी मोबाईलवरून बोलताना हॅलो नाही तर वंदे मातरम म्हणायचं असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यावरून देखील त्यांच्यावर टिका केली जात आहे.
Read also
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
- आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
- “राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
- घराणेशाहीच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मोदींना सडतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “बळजबरीने पदावर बसलं तर..;”