पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेंकावर मागील काही दिवसापासून टिकेचे झोड उठवली आहे. ‘ज्यांना उद्योग नसतात तेच लोक असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात’ असे म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेवर पलटवार केला.
‘राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना वंदन करतो, महाराष्ट्राला शुभेच्छा देतो. रयतेचा काम कसे करावे हे छत्रपतीनी शिकवले. घराघरांवर ,ग्रामपंचायती, कॉलेज ,सगळीकडे गुढी उभारून हा शिवस्वराज्य दिवस साजरा केला जातोय. रायगडावर सोहळा पाहून मोठा अभिमान वाटतो’, अशी भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.
पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत अजित दादा म्हणाले की, ‘ जी गोष्ट झालेली आहे, तिला चौदा महिने झाले आहे. आता ज्यांना उद्योग नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात’ असा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला.
Read Also :
- मी बोलल्यानंतरच एवढा गोंधळ कशाला; वडेट्टीवार यांनी केली नाराजी व्यक्त
- ‘नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलतात; तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही’
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’