ठाणे : विशाल गडावरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर ठाण्याकडे जातांना हल्ला करण्यात आला. गाडी पुढे गेली असता तीन जणांनी गाडीवर हल्ला करत गाडीची काच फोडली. सुदैवाने यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाची सर्व घटना सांगितली आहे.
हेही वाचा..विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी तर पुढे बसलो होतो. मला फक्त आवाज आला की, गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. पुढे जाऊन थांबलो. तोपर्यंत हे उलटे फिरले. तीन पोरं होती. माझ्या पोलिसांकडे ४ रिव्हॉल्व्हर होते, २४ गोळ्या होत्या. चार पोलिस होते, या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षतावर काही फरक पडणार नाही. मी मुसलमानांसाठी लढत नसतो तर मी विषयावर लढत होतो. गजापूरमध्ये तुम्ही मशिद तोडलीत. पण तिथे फक्त मुसलमान राहत नाहीत. तर तिथे हिंदू देखील राहतात. तिथे हिंदू ८० टक्के राहतात. तिथे सगळे सण एकोप्याने साजरी केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. अशी भूमिका आव्हाड यांनी मांडलीय.
हेही वाचा..विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला धाडलं पत्र
पुढे बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “कोल्हापूरच्या एका पौराणिक मशिदीबाहेर गणपतीची मूर्ती आहे. ही सामाजिक एकदा शाहू महाराजांनी जपली होती. ती सामाजिक एकता या घराण्याने जपायला पाहिजे होती. कुणाचा तरी बोलका बाहुला म्हणून हा बोलला आणि सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला. संभाजी भिडे याने जे करायचं होतं ते काम करुन टाकलं. त्यांना वाटत असेल की, गाडीवर मला दगड मारला तर मी बोलणार नाही. पण मी आता अजून तीव्रतेने बोलेन. मी आजपर्यंत तरी अहो जाओ करायचो”.
विशाल गडावरील प्रकरणाबाबत आव्हाडांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, संभाजी राजे छत्रपती महाराज म्हणणे आता त्यांना सोडून द्या. कारण तो अधिकार होता. त्यांना शाहू महाराजांची वंशपरंपरा होती. त्या वंशाचं रक्ते ते पुढे घेऊन जात होते. त्या रक्तात काय होतं आणि यांच्या रक्तात काय हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो. ज्यांनी दंगल होऊ शकते. तो शाहू महाराजांचा वारसदार होऊ शकत नाही. असं त्यांनी संभाजी राजे यांना उद्देशून म्हटलं होतं.
त्यानंतर संभाजी राजे यांच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला होता. त्यानंतर आव्हाडांच्या घराबाहेर पोलिस सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यातच आज ठाण्याच्या दिशेने जात असतांना रस्तात तीन जणांनी आव्हाडांच्या चालु असलेल्या गाडीची काच फोडली. यावेळी छत्रपती महाराज की जय ची घोषणाही देण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा..“फुकटच्या गोष्टी करून कुणी कुणाला संपवू शकत नाही”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
हेही वाचा…३० वर्षांचा माढ्याचा किल्ला यावेळी ढासळणार ? शरद पवारांची ‘तुतारी’ माढ्यात वाजणार ?
हेही वाचा..राहुल गांधींची सभागृहात जात विचारली, कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात राज्यात निदर्शने
हेही वाचा..“देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व गुण, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत तर आनंदच..”
हेही वाचा..महायुतीत बिनसलं..! नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध