सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. संजना सांघी आणि सुशांतसिंग राजपूत यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 24 जुलैला हॉटस्टारवर रिलीज होण्याची माहिती चित्रपट निर्मात्यांनी दिली आहे.
8 मे रोजी हा सिनेमा रिलीज होण्याचे ठरले होते, परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलला गेला. 14 जून रोजी सुशांतने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सुशांतचा अखेरचा चित्रपट म्हणून त्याच्या चाहत्यांसाठी हा भावनिक आणि तितकाच उत्सुकतेचा क्षण आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘दिल बेचारा’ रिलीज होणार आहे.
Every love story is beautiful, but this one is our favourite♥️ #DilBechara trailer out tomorrow. Stay tuned!#SushantSinghRajput @sanjanasanghi96 @swastika24 @Sahilwalavaid #SaswataChatterjee @CastingChhabra #SaifAliKhan #ShashankKhaitan #SuprotimSengupta pic.twitter.com/eg2SDOZiM5
— Disney+HotstarVIP (@DisneyplusHSVIP) July 5, 2020
सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा, अशी अनेकांची मागणी होती. मात्र कोरोना विषाणूमुळे थिएटर बंद आहेत. तसाच हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होत आहे. अनेक चाहते म्हणतात की आम्हाला त्याचा चित्रपट पाहायचा आहे, मात्र तो ओटीटीवर नसून तेअटरमध्ये पाहायचा आहे. मात्र सध्याच्या घडीला ते शक्य नसल्याचे चित्रपट निर्माते म्हणतात.
ट्विटरवर सकाळपासूनच सुशांतसिंह राजपूत आणि ‘दिल बेचारा’ चित्रपटाशी संबंधित पोस्ट्स पाहायला मिळत आहेत. चाहते ट्रेलर ऑनलाईन रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिला.