नाशिक : सध्या देशात कोरोनासंकटामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीही अनेक हॉस्पिटल्स रुग्णांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. रुग्णांकडून उपचारासाठी लाखो रुपयाचे बिल वसूल करत आहेत. अशाच नाशिकमधील हॉस्पिटल्सविरोधात तरुणाने केलेल्या अर्धनग्न आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हॉस्पिटलने मेडिक्लेमचे पैसे घेऊन देखील डिपॉझिट म्हणून जमा केलेले पैसे परत करण्यास नकार दिला होता. अशावेळी आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांनी थेट हॉस्पिटलमध्येच कपडे काढत ठिय्या आंदोलन केले.
नाशिकमधील एका खाजगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णांना अवाजवी बिल आकारत त्याने भरलेले डिपॉझिटचे 1 लाख 40 हजार रुपये परत करण्यास नकार दिला होता. या रुग्णांचे 10 लाख रुपये मेडिक्लेम कंपनीने हॉस्पिटलला दिले होते. मात्र, तरीही हॉस्पिटलने सेफ साईड म्हणून 1 लाख 40 हजार रुपये डिपॉजीट म्हणून घेतले होते. ते परत देण्यास नकार दिला. अशावेळी आक्रमक होत भावे यांनी आंदोलन केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटलच्या लुटीवरून राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी देखील सवाल केला. राजेश टोपे साहेब तुमच्याकडे या लोकांना शिक्षा नाही का ? फक्त गरीबांना छळण्यासाठी कायदा आहे का ? हॉस्पिटल्सने अशाप्रकारे लूट केली तर ह्याला दरोडेखोरी, डकैती म्हणायचे नाही का ? राज्य, केंद्र, पोलीस सुद्धा हतबल आहेत का ?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
Read Also :
- ‘गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा’
- ‘…अन्यथा लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही झुगारुन दुकानं सुरु करु’
- ‘राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणे म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न’
- ‘… तर गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते’, यशोमती ठाकूर यांची मोदींवर टीका
- ‘काहीजण रडकथेचाच डाव मांडून ‘रडकी बात’ वेशीवर टांगतात’