पुणे : ज्या लाल महालात छत्रपती शिवरायांच बालपण गेले त्या लाल महालाबद्दल शिवप्रेमींच्या मनात एक वेगळे स्थान आहे. अशा या पवित्र लाल महालात गेल्या ९ वर्षांपासून आम्ही शिवराज्याभिषेकाचा हा सुवर्णक्षण लाल महालात साजरा करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाल महालात प्रतिवर्षी साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. परंतु परंपरा कायम ठेवन्यासाठी आम्ही कमीत कमी लोकांत शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय शिवमहोत्स समिती, संभाजी ब्रिगेड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन यांच्या वतीने लाल महालात या सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळात आम्ही आमची परंपरा जपत आज शिवमूर्ती ला शिराज्यभिषेक पुष्पअभिषेक व इंद्रायणीच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक माजी आयुक्त व सचिव रायगड विकास प्राधिकरणाचे संचालक प्रभाकर देशमुख यांच्या शुभहस्ते व फरासखाना पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आला करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिन हा लोकोत्सव व प्रेरणादिन..
छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेच राज्य निर्माण केलं त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या कोंदणात बांधून संकुचित करू नये कारण जगाच्या इतिहासात असा राजा होणे नाही, नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार, प्रजादक्ष, राष्ट्राभिमान स्वाभिमान, सर्व सामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, केवळ विचारातून नव्हे तर कृतीतून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम या महामानवानं केलं. अशा जागतिक कीर्तीच्या राजाचा राज्याभिषेक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. शिवरायांच्या जीवन चरित्रातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रचंड मोठी प्रेरणा मिळते.
आज ऐतिहासिक लाल महालातील छोटेखानी कार्यक्रम प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत व विकास आण्णा पासलकर,संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, कैलास वडघुले,विराज तावरे ऍड अतुल पाटील मोनिका व वैशाली पायगुडे संतोष पासलकर,पंढरीनाथ सोडकर, निलेश इंगवले, पैलवान शेलार ,बाळू जोशी राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Read Also :
- ‘आधी सरकारने भूमिका जाहीर करावी, मग आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू’
- १६ जुनला पहिला मराठा मोर्चा काढणार; संभाजीराजेंची रायगडावरून घोषणा
- ज्यांना काम नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटणार
- मी बोलल्यानंतरच एवढा गोंधळ कशाला; वडेट्टीवार यांनी केली नाराजी व्यक्त
- ‘नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलतात; तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही’