मुंबई : महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून ५ लाख महिलांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार हे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने ही योजना महिला सबलीकरण आणि आर्थिक मदतीसाठी सुरू केली होती. तथापि, काही निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदारांची वज्रमुठ, पत्रकार परिषद घेत जाहिर केली भूमिका
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार टिका केली होती. त्यात आता या योजनेतून काही महिलांना अपात्र करण्यात आले आहे. अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी २,३०,००० महिला, वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिला आणि चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी तसेच स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिलांचा समावेश आहे. एकूण ५,००,००० महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…९० दिवसात टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार..! उदय सामंतांनी सांगितली आतली बातमी
राज्यातील सर्व पात्र महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळावा. यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. यासंदर्भात कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या योजनेवर विरोधकांकडून टीका केली जात होती. मात्र, सरकारने स्पष्ट भूमिका घेत योग्य निकषांवर आधारित निर्णय घेतला आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. विशेषतः गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा हेतू आहे. परंतु, योजनेचा लाभ खरोखर गरजू महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले असले तरी, या निर्णयामुळे पात्र महिलांना अधिक चांगल्या प्रकारे लाभ देता येणार आहे.
हेही वाचा…“एक रेड्याचं शिंग नक्की आणणार अन्…” संजय गायकवाड राऊतांवर भडकले
हेही वाचा…“त्यामुळेच राहुल गांधींची आता रडारड सुरू झालीय”, भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
हेही वाचा…कृषी विभागातील सर्वात मोठा घोटाळा..! धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या
हेही वाचा…“तोच विनोद पुन्हा-पुन्हा..”, राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..! राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला