मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि इतरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दोन तास चाललेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
परमबीर सिंग भारतातच, ४८ तासांत हजर होतील; कोर्टात वकिलाचा दावा
संजय राऊत म्हणाले, आज महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्यासंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांसोबत राज्यातील गंभीर विषयांवरच चर्चा झाली. परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल इतका मोठा विषय नाही.
एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरचं तो विषय सुटेल. एसटी संपाबाबत शरद पवार आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल. आजच्या पवार यांच्या बैठकीतुन असं मला समजलं को त्यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत.
“…यांचं म्हणजे अति शहाणा त्याच्या बैल रिकामा असं झालायं..!”
महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का करत आहे हे सर्वांना माहिती आहे. एसटीच्या संपात कोण तेल ओतत आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न अमरावती पासून एसटी संपापर्यत होत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वाना सहानुभूती आहे.
Read Also :
- “महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या
- पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
- अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
- शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात
- पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?