ठाणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, येऊर येथे ग्लोडन स्वान कंट्री क्लब नावाने क्रिकेटसाठी जागतिक दर्जाचे इनडोअर टर्फ सुरु करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी आले असता, यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण हे देखील उपस्थित होते. ‘क्रिकेट खेळतच आम्ही राजकारणात आलो, क्रिकेटच्या ज्ञानामुळेच आमचे राजकीय ज्ञान वाढले”, असं मिश्किल भाष्य त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला वाढता विरोध, मनसेही मैदानात
‘येऊर येथील इनडोअर क्रिकेट तर्फे जे पीच तयार केले आहे, ते अतिशय उत्तम दर्जाचे आहे. याचा फायदा मुंबईतल्या खेळाडूंसह इतरांना देखील होईल. मी कॉलेजपासूनच क्रिकेट खेळत होतो. अनेक टुर्नामेंट खेळलो. तिथे केलेल्या बॉलिंगचा आणि बॅटिंगचा उपयोग राजकारणात देखील होतो. लूज बॉलवर कसा सिक्सर मारला पाहिजे, कुणाला कोणत्या चेंडूवर बोल्ड करायचे हे क्रिकेटमध्ये समजायचे. त्याचाच उपयोग आता राजकारणातही होतोय,’ असं सूचक विधान देखील त्यांनी केलं.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह व्हा, दिवसातून किमान एक तरी पोस्ट शेअर करा – राष्ट्रवादीचे आवाहन
तसेच, ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत ५० टक्केच्या आत आरक्षण देण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. त्याचा सविस्तर वृत्तांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन बुजबळ यांनी दिला आहे. काल कोकणासाठी साडे तीन हजार कोटी रुपये ४ वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर केले आहेत,’ अशी माहिती देत, ‘नाणारचा विषय कधीच संपला आहे. परंतु स्थानिक लोकांना जे आवश्यक असेल त्याठिकाणी शिवसेना उभी राहील,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
‘मुख्यमंत्री प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांनी संकट काळात चांगले काम केले. देश पातळीवर उद्धव ठाकरेंचा क्रमांक वर आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ सुटलं आहे. विरोधकांनी वर्षानुवर्ष विरोधच करत राहावा. कारण त्यांना आता त्याच बकावरच बसायचे आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा”, असा टोला लगावत, ‘एमपीएससीच्या जागा भरण्यासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आम्ही १००% त्यांच्या पाठीशी आहोत”, असं ते म्हणाले.
Read Also :
- मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, संभाजीराजे कडाडले…
- चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
- “माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल”
- स्वप्न पुर्ण झालं: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
- परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळून लावली