राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
उदय सामंत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक हे सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आले होते. काही दिवसांपुर्वीच आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
आका स्वीय सहाय्यकला कोरोनाची लागण झाल्यानंतर उदय सामंत यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःला क्वारंटाईन केले आहे. त्यांनी मुंबईत स्वतःला क्वारंटाईन केले आहे.