‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना चांगेलचं फटकारले .
आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संसदेच्या राज्यसभा सदनात पार पडला. आजच्या शपथविधीमध्ये भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ , मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेताना ‘I Udayanraje Pratapsinhraje Bhosale ‘ अशा इंग्रजी शब्दात सुरुवात केली आणि शपथ झाल्यानंतर त्यांनी सदनात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे भोसले यांच्या घोषणा दिल्याच्या कृतीवर आक्षेप घेतल.
‘तुम्ही सदनात नवीन आहात, अशा प्रकारच्या घोषणा देण्याची मुभा सदनात नाही, त्यामुळे हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल असं व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. याशिवाय ‘हे, पुन्हा सांगण्याची गरज भासू नये ‘ अशा तिखट शब्दात उदयनराजे यांना तंबी दिली.