राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये गेलेले छ. उदयनराजे भोसले यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. गतवर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी सोडून खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले होते.
मात्र, ऑक्टोबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. भाजपप्रवेशापूर्वीच उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभा देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट देण्यात आले.
दरम्यान, राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीत राज्यसभा सदनात सकाळी 11 वाजता पार पडला. महाराष्ट्रातून सात जणांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, भागवत कराड, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी खासदारकीची शपथ घेतली.
Today taking a oath of member of rajya sabha in parliment. pic.twitter.com/GdQwWzhJ8l
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 22, 2020