मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा मोदींना भेटणार आहेत. या भेटीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.
चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजुन घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारिपाठाचा 'शकुनी' डाव टाकल्या शिवाय राहणार नाही.@TV9Marathi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
अजुन बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार वर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झालाय.बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2021
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झाला आहे. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले.
Read Also :
- ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’