मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा केल्याची माहीती समोर येत आहे. सोमवारी सह्याद्री अतिथिगृहात या दोन्ही नेत्यांची भेटही झाली होती. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे राजकीय संवाद साधता आला नाही. त्यामुळे आज ही भेट झाल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली.
देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारामतीमधील innovation scientific research institute च्या उदघाटन सोहळ्याचं निमंत्रणही दिलं. या संस्थेचं उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका देण्यासाठीही शरद पवार मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते.
साखर कारखान्यांना ईडीने नोटीसा बजावल्या, पण त्यांच्यावर कारवाई होणार नाही – देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
आर्यन खानला आज जामीन मिळावा, हीच माझी प्रार्थना आहे; भाजप आमदार राम कदम
दोन दिवसांपूर्वीही शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानबाबत शेतकऱ्यांना मदत, कोविड निर्बंध हटविण्याच्या संदर्भात चर्चा तसेच कोविडमुळे संकटात आलेल्या अवजड वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती.
Read Also :
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा ललकारलं
- भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार, गरीबांना लुटणाऱ्यांना आमचं सरकार सोडणार नाही – नरेंद्र मोदी
- अजितदादा, मला परवानगी द्या, त्या किरीट सोमय्याला बघून घेतो – आमदार शशिकांत शिंदे
- शिवसेनेला लागली साडेसाती? एकनाथ शिंदे यांची ज्योतिषाकडे धाव, तर्कवितर्कांना उधान
- शिवसेना खासदार भावना गवळींना चिकन गुनियाची लागण; ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत!