मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही उत्तर दिले
शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर केलेल्या विधानावरही विचारणा केली.त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपले स्पष्ट मत मांडून उत्तर दिले