राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या सरकारच्या गाडीचं स्टेअरिंग कोणच्या हातात आहे उद्धव ठाकरे कि अजित पवार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. या प्रश्नावर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
नक्की महविकासआघाडी सरकारच स्टेरिंग कुणाच्या हातात आहे. या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले,” आम्ही कारही चालवतो आणि सरकारही चालवतो. कार आणि सरकार दोन्ही चांगले चालले आहेत आणि सगळे जण एकमेकांना मदत करू सगळं व्यवस्थित चालू आहे.”
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ‘या तीन चाकी सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हाती आहे.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा इलेक्ट्रीक कारमधील एक छायाचित्र शेअर केले होते. यामध्ये कारचे स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात होते
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास केला. उद्धव ठाकरे यांच्या या स्टंटबाजीनंतर पुन्हा एकदा नक्की स्टेअरिंग कोणाच्या हातात अशी चर्चा रंगू लागली होती.