मुंबई : काल उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुखांची सभा घेतली. त्या सभेत त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हा जगातील सर्वात ढ माणूस आहे. अमित शहांचा दौरा तुम्हाला का झोंबला असा खोचक सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
“उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
शिवतीर्थावर दसरा मेळावा हा शिवसेनेचा होणार असून एकनाथ शिंदे तो घेणार आहे. या दसरा मेळाव्यात आम्ही असणार आहे. त्यामुळे कुणी या दसऱ्या मेळाव्यात कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर येणारे किती आणि जाणारे किती हे पोलीस मोजणार. त्यामुळे त्यांनी या दसरा मेळाव्यात येऊन दाखवावं असं आवाहन देखील नारायण राणे यांनी दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं कालंच भाषण हे दारू पिऊन दिलं असल्याचा टोला देखील त्यांनी हाणला आहे.
“महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
माझ्या बंगल्याच्या आजुबाजूला अनेक बंगले अधिकृतपणे बांधले गेले आहेत. त्यामुळे मुंबईत फक्त नारायण राणेंचं घर दिसत आहे का? याघरामध्ये कोणतीही इंचभर जागा वाढविली नाही. त्यामुळे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. असं देखील नारायण राणे यांनी सांगितलं आहे. तसेच माझ्यावर झालेली कारवाई ही आकसापोटी झाली असून त्याला माझा विरोध आहे. असंही ते म्हणाले.
“हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
दरम्यान, नारायण राणेंना मुख्यमंत्री पद देऊन नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना फोन करीत होते. तसेच ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करीत होतो, तेव्हा देखील त्यांनी अमित शहांना फोन केल्याचा आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला.
Read also
- “हिमंत असेल तर शिंदे गटातील आमदारांना भाजपानं पक्षात विलीन करावं”; भास्करराव जाधव
- “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- “तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
- “ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
- शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”