कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भाजप सरकार जबाबदार; शरद पवारांची साक्ष
दरम्यान, या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कल्याण-डोंबिवली शहरात शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे होत आहे. महापालिका आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास होताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत या नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहे. आपल्या भागाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात फोडाफाडीचे कुठलेही राजकारण नाही. यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुढेही अनेक पक्ष प्रवेशाचे सोहळे होणार आहे, असे संकेतही त्यांनी दिले.
ज्या महानगरपालिका क्षेत्रांत निवडणूक आहेत तिथे फक्त मनसेच नाही तर आमच्या मित्र पक्षांमधील लोकही शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. अनेक ठिकाणी अन्य पक्षातील माजी आमदार नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत येत आहेत. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना एक नंबरचा पक्ष असेल. तसेच महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्हाला बंधनकारक असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मनसेचे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव (प्रभाग क्रमांक १२२ निळजे घेसर) आणि पूजा गजानन पाटील (प्रभाग क्रमांक १२१, कटाई -घरीवली) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. तसेच यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मनसे कल्याण तालुका प्रमुख गजाजन पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
Read also:
- “कशासाठी काढताय तुम्ही भोंगे..का करताय तुम्ही अशी सोंगे?”; आठवलेंनी टोचले ठाकरे बंधूंचे कान
- मनसे नेते संदीप देशपांडे अजूनही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
- राज यांच्या मागे कोर्टाचा ससेमिरा; राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ
- “मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको” संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- “त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरु झाला”
- गुन्हे केवळ आमच्यावरच सिद्ध होतात इतरांवर नाही; राणा दाम्पत्याच्या जामिनावर राऊतांचा टोला