मुंबई : शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होता येणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मुख्यमंत्र्यांची सही, मग पक्षप्रमुखांची सही, मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करू मंत्रालयात लावा म्हणजे सगळ्यांना कळालं असतं. त्याचबरोबर माझ्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनवला आहे. अशी टिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढली. तेव्हा माझं त्यांनी ऐकलं नाही आणि आता ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं. आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं. तथाकथित शिवसैनिकांना मुख्यमंत्री केलं. असंही ते म्हणाले.अडीच वर्षापुर्वी अमित शहा आणि आमचं मुख्यमंत्रीबाबत ठरलं होतं. मात्र त्यावेळी नकार देऊन भाजपने आता का केलं? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
पाठीत वार करून आणि शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होता येणार नाही. पहिल्यांदाच तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल पण मुंबईच्या पाठीत वार खुपसू नका. माझा राग मुंबईवर काढू नका, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मेट्रो कारशेडबाबत भाष्य केलं आहे.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
अमित शहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मुख्यमंत्र्यांची सही मग पक्षप्रमुखांची सही,मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करू मंत्रालयात लावा म्हणजे सगळ्यांना कळलं असतं. माझं एकलं असतं तर अडीच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. असंही ते म्हणाले.
Read also
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
- सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
- शिंदे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षांसाठी केसरकर, विखेपाटील चर्चेत; उद्या अधिवेशन
- “पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”