मुंबई : बीकेसीमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंचसुत्री कार्यक्रम जाहीर केला. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यामध्ये सात महत्वाचे आश्वासन ठाकरे गटाने महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे. यात विशेष करून राहुल गांधी यांच्याप्रमाणे जातनिहाय गणना व्हावी, असेही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“माधुरीताईंचा चौथा विजय हा रेकॉर्ड ब्रेक होईल”, पर्वतीत देवेंद्र फडणवीसांनी सभा गाजवली
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला त्यांनी वचननामा असे नाव दिले आहे. त्यात त्यांनी वचननाम्यावर क्युआर कोड सुद्धा देण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात ठाकरे यांनी आम्ही कोळीवाड्याची ओळख पुसू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या जाहीरनाम्याची अनेक वचनं महाविकास आघाडीच्या जाहीरनामा सोबतची आहेत. धारावीमध्ये वित्तीय केंद्र उभारू, नोकरी नोकरी आणि नोकरी या आमच्या तीन प्राथमिकता आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…भोरमध्ये चौरंगी लढत..! महायुतीत बंडखोरांचा सुळसुळाट
उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा उल्लेख
१. धारावी पुनर्विकासाआडून बकालपणाचा सरकारचा डाव हाणून पाडणार.
२. मुंबई आणि महाराष्ट्रराचं नवे गृहनिर्माण धोरण ठरवणार.
३. कोळीवाड्यांचा क्लस्टर जीआर रद्द करणार.
४. राज्यातील बेरोजगारी हटवणार.
६. राज्यातील भूमिपूत्रांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार
7.मुलींप्रमाणे मुलांनांही मोफत शिक्षण देणार.
८.जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार.
दरम्यान, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बळीराजाला वाचवण्यासाठी राज्यात आघाडीचं सरकार यावं”, शरद पवारांचा विश्वास
हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !
हेही वाचा…सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टिका, अजित पवार संतापले, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार ; पण…. ?