मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केला, अन् त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसला. अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे यांना अनेक संघटना पाठिंबा देत आहेत.
“ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
दोन दिवसापुर्वी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आपल्या पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण केले आहे. गायकवाड यांनी यापुर्वी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव व प्रवक्ते म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी युनायटेड रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून नगर जिल्ह्यात संघटन केले होते. यातच आता राष्ट्रवादीचा माजी जिल्हाध्यक्षांनी देखील उद्धव ठाकरेंची वाट धरली आहे.
शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित औरंगाबादमधील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे, वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया, संघर्ष सोनवणे व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. विजयराव साळवे हे पुर्वी भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा झेंडा हाती पकडला. तसेच त्यांचे अजित पवारांशी जवळचे संबंध होते असं असताना त्यांची अलिकडेच शहराध्यक्ष पदावरूनन उचलबांगडी केली होती. त्याच नाराजीतून त्यांनी सेनेते प्रवेश केल्याचं समजत आहे.
“उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
दरम्यान, यावेळी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंग राजपुत इत्यादी उपस्थित होते.
Read also
- “माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “उद्धव ठाकरेंनी कालचं भाषण दारू पिऊन केलंय”; अन् नारायण राणेंची जीभ घसरली
- “हिमंत असेल तर शिंदे गटातील आमदारांना भाजपानं पक्षात विलीन करावं”; भास्करराव जाधव
- “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- “तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार