मुंबई : हिंमत असेल तर, पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणुक घ्या अन् आणखीनच हिमंत असेल तर त्या सोबतच विधानसभेची निवडणुक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जामीन दाखवण्याची भाषा करीत आहता. परंतु आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्य़ाशिवाय राहणार नाही. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं आहे. तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, अस देखील त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. काल शिवसेना प्रमुखांचा पक्ष मेळावा पार पडला त्यामध्ये ते बोलत होते.
“भाजपला टक्कर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असं सध्या लोकांना वाटतेय”
महापालिका निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्केअर फुटाने विकण्याची जागा आहे. आमच्यासाठी ती 105 वीरांच्या बलिदानातून मिळवलेली मातृभूमी आहे. ती आमची आई आहे आणि आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
रामदास आठवलेंच्या पक्षातील सचिवांनी केला शिवसेनेत प्रवेश; थेट पक्षचं केलं सेनेत विलीन
आज माझ्या घराण्यावर बोल आहेत. पण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, पण भाजपवाल्यांचा वंश कोणता? असा सवाल करीत इतके उपरे घेतले की, 52 कुळे आहेत की, 152 कुळे हेच समजत नाही असा चिमटा देखील त्यांनी भाजपाचा काढला. त्याचबरोबर त्यांनी भाजपचा उल्लेख पुन्हा एकदा कमळाबाई म्हणून केला. या कमळाबाईंशी मुंबईचा संबंध काय ? असा सवाल करीत यांच्यासोबत आमची युतीमध्ये 25 वर्ष सडली असं पुनर्च्चार देखील त्यांनी केला.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी सडकून टिका केली. वेदांताबाबत धांदात खोटे बपोलत आहात. धारावीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गेले. कोणाची बाजू घेऊन बोलत आहात. होय महाराजा, म्हणत दिल्लीचे मिंधे झाला आहात. असा खोचक टोला त्यांनी शिंदेंवर लगावला. त्याचबरोबर मी बाळासाहेबांळाचा मुलगा आहे असे वारंवार तुम्हाला का म्हणावे लागते, काही शंका आहे का, या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या विधानांचा त्यांनी समाचार घेतला. आजवर मुले पळविणारी टोळी ऐकली होती. पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे. आम्ही त्यांना सत्तेचे दुध पाजले, त्यांनी तोडांची गटारगंगा उघडली आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- “शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम
- “एकनाथ शिंदें काॅंग्रेसमध्ये तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण..;” चंद्रकांत खैरेंचा मोठा खुलासा
- कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड
- “पवार साहेब तुम्हीच सांगा..! 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?”; भाजपचा सवाल