पंढरपूर: नुकतीच पंढरपूर पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये आपण सर्वपक्षीय राजकीय आरोप प्रत्यारोप ऐकले, त्यानंतर आता उजनी पाणी वाटपासंदर्भात नवीन पेच उभा राहिला आहे. त्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले असून एकमेंकावर आरोप करण्यास सुरवात झाली आहे. उजनी धरणातून जाणारे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा जो काही हुकूमशाही निर्णय ठाकरे सरकार आणि पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी घेतला होता त्याला सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ८ आमदार आणि दोन खासदार यांनी कडवा विरोध केला. खासदारांनी धरणे आंदोलन देण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता आणि उपोषण देखील केले होते. सोलापूर जिल्हातील काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन केली आहेत आणि त्यामुळे या सर्वांची दखल घेण्यात आली आहे असे आमदार प्रशांत परिचारक Amdar Prashant Parichark यांनी म्हटले आहे. Ujani Dam: Latest News
सोलापुरात होणाऱ्या आंदोलनामुळे आणि तीव्र असंतोषामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी धसका घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटले. सोलापूर जिल्ह्यात उरलीसुरली जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे , तीसुद्धा आता उजनीच्या पाणी प्रश्नावरून धुळीला मिळेल, असे वातावरण तयार झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटीलयांनी स्वतःच्याच कुणाला तरी व्हिडिओ करायला लावून इंदापूरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे, अशी खरमरीत टीका देखील आमदार प्रशांत परिचारक Amdar Prashant Parichark यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली. Ujani Dam Update
उजनी जलाशयातून Ujjani Dam इंदापूर तालुक्यासाठी देण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना रद्द करता येतो का? असा प्रश्न प्रशांत परिचारक Prashant Parichark यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. जोपर्यंत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ठाकरे हे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय रद्द झाल्याची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारासुद्धा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. Ujani Dam: News, Photos, Latest News