प्रतिनिधी – कयाम नवाब, पॉलिटीकल महाराष्ट्र, यवतमाळ
उमरखेड विधानसभा मतदारसंघा हा यवतमाळ जिल्ह्याचे शेवटचे टोक मागील अनेक दशकापासून उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा विकासापासून कोसो दूर याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज ही उमरखेड विधानसभा मतदारसंघात उमरखेड तालुक्यातील जंगल भागातील ज्याला परिसरात बंदीभाग म्हणून ओळखला जातो या बंदीभागाततील अनेक गावांना जोडण्याकरिता आज ही डांबरी रस्ते नाहीत की ज्या रस्त्यामुळे ह्या बंदीभागतील गावे मुख्य रस्त्यानं जोडल्या जाईल. तसेच या बंदीभागात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत आरोग्य सुविधेचा नावावर नुसत्या उभ्या आहेत त्या इमारती ज्या इमारती मध्ये कोणत्याच आरोग्य विषयक भौतिक सुविधा नाहीत आणि पुरेसे कर्मचारी ही नाहीत. आणि असेच काही शिक्षण सुविधेचा सुद्धा प्रकार आहे अश्या अनेक समस्यांने ग्रासला आहे उमरखेड विधानसभा मतदारसंघ आणि याच्या पाठोपाठ याच मतदारसंघातील महागाव तालुक्यातील कमी जास्त हीच परिस्थिती या सगळ्या कारणाने मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगाराचा वाढता टक्का.
या मतदारसंघात मागील अनेक दशकापासून विविध नेत्यांनी या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले पाहिले या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्या होते मग हळू हळू किंग्रेसची जादू ओसरली आणि भाजपा ने हा मतदारसंघ काबीज केला आणि कधी काँग्रेस तर कधी भाजप असा लपंडाव सुरु झाला. पण भाजपा आघाडीवर राहिली आणि काँग्रेस पिछाडीवर गेली. अस वाटत होत की उमरखेड विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस हद्दपार होणार पण जवळपास दीड वर्षांपूर्वी अचानक एक नेतृत्व उभारून आलं ते म्हणजे साहेबराव कांबळे यांच्या रुपात आणि मागील एका दशकापासून मरगळ आलेल्या काँग्रेसला उभारणी देण्याचं काम साहेबराव कांबळे यांनी केलं.
हेही वाचा…राजकारणातील चाणक्य, अजितदादा..! विधानभवनासमोरच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
महराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तातुभाऊ देशमुख आणि माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर आणि उमरखेड विधानसभेत ज्याची किंगमेकर म्हणून ओळख आहे असे गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी संपूर्ण उमरखेड विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला दीड वर्षात गावागावात कार्यकर्यांच्या फौज निर्माण केल्या अनेक उपक्रम राबविले त्यात डोळ्याचे शिबीर, भव्यदिव्य हळदी कुंकुवाचा कार्यक्रम, सुशिक्षित बेरोजगार मेळावा, सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना प्रायव्हेट सेकट्टर मध्ये नौकरी, गरजूंना मदत मग दवाखाना असो की शिक्षण क्षेत्र. साहेबराव कांबळे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंत्रालयात काम पाहिले त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव कितीही अवघड काम करण्यात अगदी कौशल्य प्राप्त आहे साहेबराव कांबळे यांना त्यांनी हे सर्व करून दाखवले अवघ्या दीड वर्षात आज विधानसभा मतदारसंघात प्रत्येकाच्या मनात घर करून आपली जागा निर्माण केली ती साहेबराव कांबळे यांनी. जे इतरांना 50 वर्षात जमलं नाही. ज्या पुढाऱ्यांनी नुसते पदे भोगली नुसती जनतेची मते घेऊन पदावर विराजमान झाले. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम तर सोडाच पण विधानसभेला विकासापासून कोसोदुर ठेवले उमरखेड विधानसभा मतदारसंघात अनेक समस्येचे डोंगर आहेत अनेक समस्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात त्यातच सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. आणि यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा टक्का वाढत गेला. निवडणूकी आल्या की पुढाऱ्यांन कडून नुसते आश्वासने. कोणीही सुशिक्षित बेरोजगराकडे लक्ष्य देण्यास तयार नव्हते उमरखेड विधानसभा मतदार संघात फिरत असतांना साहेबराव कांबळे यांनी पाहिले की सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही.आणि बेरोजगारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानं माहीत होतं की ग्रामीण भागातलीत गरीब सुशिक्षित बेरोजगार याला शहराच्या ठिकाणी जाऊन प्रायव्हेट सेक्टर मध्ये जाऊन नोकरी शोधणे किती कठीण आहे याचा विचार करून सुशिक्षित बेरोजगार मेळावा घेतला यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांना फायदा झाला. आणि आज उमरखेड विधानसभा मतदारसंघात त्यांना भविष्यातील नेतृत्व आहे असे ही जनतेतून बोलल्या जात आहे. जर काँग्रेस पक्षाने साहेबराव कांबळे यांना संधी दिली तर याचा फायदा काँग्रेसला आणि विकासाच्या माध्यमातून जनतेला होईल आणि येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने साहेबराव कांबळे यांना संधी द्यावी असे ही जनतेतून बोलल्या जात आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे जे काम लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांनी करायला पाहिजे ते काम साहेबरावजी कांबळे यांनी केले. जे 50 वर्षात उमरखेड विधानसभा मतदारसंघातील पुढाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना जमलं नाही ते साहेबराव कांबळे यांनी कसे जमले असे ही जनतेतून बोलल्या जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“अन् पुन्हा विधानसभेत जिंकून दाखवू आपला महाराष्ट्र,”मोदींसमोर शिंदेंचं जोरदार भाषण
हेही वाचा…“महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येईल”, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडीया आघाडीचा दबादबा.. तब्बल ‘इतक्या’ जागा जिंकल्या