नागपुर : नागपुरमध्ये उद्योजकांच्या एका कार्यक्रमाला केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात संबोधित करताना आपण विहरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर नितीन गडकरी चर्चेत आहेत. त्यामुळे ते काँग्रेस जाणार काय अशी चर्चा होती. मात्र गडकरी यांच्या या वक्तव्याने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
“हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगतलं की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणर नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.
“केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
कार्यक्रमात उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले की, प्रत्येकाने व्यवसाय करताना ह्युमन रिलेशनशिप जोपासली पाहिजे. कुणाचे वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो. एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका, उगवत्या सूर्याची पूजा करू नका. परिस्थिती नुसार बदलू नका. युज एंड थ्रो पॉलिसी चांगली नाही, असा सल्ला देखील गडकरी यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
सोबतच, पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण आपले पोस्टर्स लावणार नाही, कोणाला काही देणार नाही. जर तुम्हाला मतदान करायचं तर करा नाहीतर नका करू, असही वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलेलं चांगलच चर्चेचा विषय ठरत आहे.
Read also
- चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
- “तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
- “रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
- “कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
- “झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल