पुणे : राज्यात कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता पुण्यात देखील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा असलेली PMPML बससेवा सोमवारपासून ५० टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात सोमवारपासून काय सुरु होईल व काय असेल बंद असेल, जाणून घेऊया.
- सोमवारपासून दुकानांची वेळ दुपारी ४ पर्यंत! पुणे मनपा हद्दीत अत्यावश्यक आणि इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्याचा निर्णय आपण घेतला असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.
- हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवारदरम्यान दु. ४ पर्यंत सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात येत आहे. दुपारी ४ नंतर आणि शनिवार-रविवारी पार्सल सेवा देता येईल. घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील. सोमवारपासून लागू.
- सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने, चालणे आणि सायकलिंग आदींसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली असून हा नियम आठवड्यातील सर्व दिवस लागू असेल.
- पुणे मनपा हद्दीतील मॉल्स आणि सिनेमागृह तूर्त बंदच ठेवण्यात येत असून सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स असे दोन्ही प्रकारातील सिनेमागृह बंद राहतील.
- पुणे मनपा हद्दीतील सर्व खासगी कार्यालये एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांसह दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
- व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, Wellness Centers आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळ घेऊन (Appoinment) दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूलित (AC) वापरता येणार नाही.
- शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा असलेली PMPML बससेवा सोमवारपासून ५० टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्यात येत असून उभा राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल.
- सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात येत असून ५० लोकांना उपस्थिती देण्यात येत आहे. सदरील कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुपारी ५ पूर्वी घेता येतील.
Read Also :