मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून, अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असणाऱ्या, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची, आता थेट तळोजा कारागृहात जाऊन चौकशी करण्यात येणार असून, गुरुवारी वाझेची तुरुंगात चौकशी करण्याबद्दलची परवानगी, विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला दिली आहे.
जावयाला समोर बसवून खडसेंची, ईडीकडून ९ तास मॅरेथॉन चौकशी; काय घडले, वाचा सविस्तर
सचिन वाझे, सध्या अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरणात, नवी मुंबईतील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे, आता विशेष पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार, ईडी वाझेची थेट कारागृहात जाऊन चौकशी करू शकणार आहे. यामुळे, आता या प्रकरणातील घडामोडींना वेग येणार असून, चौकशीमधून अजून धक्कादायक पुरावे ईडीच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
“पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”, संजय राऊत यांची शिवगर्जना
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांना, ईडीने आधीच ताब्यात घेतले असून, चौकशी दरम्यान डीसीपी राजीव भुजबळ आणि सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. यात बार मालकांनी ३ महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली ईडीला दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
तसेच, ईडीकडून देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना देखील अटक करण्यात आली असून, सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली आहे. ४ कोटी ८० लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले, हेच पैसे वझेने कुंदन शिंदेला दिले आणि कुंदन शिंदेने हे पैसे देशमुखांना दिले, असा खुलासा वाझेनं जबाबात केला आहे, अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे.
Read Also :
- काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
- पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!
- राऊतांच्या चमकोगिरीचा आणि सामनाच्या संपादकाचा काय संबंध? याचा खुलासा द्यावा – चित्रा वाघ
- सहकार क्षेत्रात केंद्राची ढवळाढवळ; मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार?