मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, या पार्श्वभूमीवर आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची, त्यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या घरामध्ये भेट घेतली.
दरम्यान, या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी, “मराठा समाज या मुद्द्यावरून किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, तसेच मराठा समाजाची एकंदरीत परिस्थिती कशी आहे, याची कल्पना मी पवारांना दिली. तसेच, ‘मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, आणि नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, अशी विनंती मी त्यांना केली आहे. आमची चर्चा सकारात्मक झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
यावरून, भाजपचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी एक ट्विट करत छत्रपती संभाजीराजेंवर टीका केली असून, “संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही,” असा जोरदार हल्लबोल त्यांनी केला आहे.
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही. https://t.co/BDcXXdl7QM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 27, 2021
छत्रपती संभाजीराजेंचा दौरा हा आता शेवटच्या टप्प्यात असून, आज ते पुण्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत, तसेच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करुन ते मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
Read Also :
- ‘सोनिया गांधीच्या पत्राचीही दखल नाही! आता आम्हाला विचार करावाच लागेल’
- ‘आघाडी सरकारवर पवार साहेबांचा वरदहस्त; त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार!’
- अखेर सोलापूरकरांना दिलासा उजनीतून पाच टीएमसी पाणी उपसा आदेश रद्द
- जळगावचा बदला घेतला माथेरानमध्ये, शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपत प्रवेश
- ‘पवार साहेब! मुख्यमंत्री, विरोधी पक्ष आणि नारायण राणे यांना एकत्र आणा’ – संभाजीराजे