मुंबई : आज काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपत प्रवेश केला असून, त्यामुळे राज्याची, तसेच प्रामुख्याने मुंबई महापालिकेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच या बड्या नेत्याने हा पक्ष प्रवेश केल्याने, मुंबईमध्ये भाजपला मजबूत होण्यास आणखी बळ मिळाले आहे.
मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित, मुंबईमध्ये आज भाजपत पक्षप्रवेश केला. गेल्या कित्येक दिवसांपासून कृपाशंकर सिंग झाकोळले गेले होते. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, त्यांनी हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्याने महापालिकेतील समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
यावेळी त्यांनी, “मला भाजप प्रवेश कधी करणार यासाठी अनेकांचे फोन येऊन गेले. पण भाजपला वाटेल तेव्हाच मी प्रवेश करेन, असे उत्तर मी देत होतो. अखेर आज तो दिवस उजाडला आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते होते. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसकडून त्यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी विविध पदं भूषवली आहेत.
जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य करताना, “ते काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. पण जेव्हा त्यांना कळलं की मोदी काश्मीर प्रश्नावर अंतिम उपाय शोधत आहेत आणि काँग्रेस त्याला विरोध करत आहे. त्यावेळी त्यांनी मोदींना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आणि काँग्रेसने समर्थन दिलं नाही, तर मी पक्ष सोडेन असा इशारा दिला. मात्र, काँग्रेसने समर्थन दिलं नाहीआणि त्यांनी पक्ष सोडला. मात्र त्यानंतर लगेच भाजप मध्ये न येता त्यांनी, जवळपास २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केलं आणि आता ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा त्यांचा या पक्षातून त्या पक्षात झालेला प्रवेश नसून, हा प्रवेश एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झाला आहे,” असं भाष्य त्यांनी केलं आहे.
Read Also :
- “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
- “या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”