पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पण त्यात भाजपासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पुणे महापालिकेत फडणवीस सरकारच्या काळात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपा नगरसेवकांची संख्या ९० च्या पुढे पोहचली होती. मात्र आगामी महापालिका निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणातून भाजपाला पालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा सर्व्हे इतर कुणी नसून तर भाजपानेच केला असल्याने स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे, २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची टीक-टीक वाजणार का?, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे महापालिकेतल्या भाजपची जनतेच्या पैशांवर फुकट फौजदारी; जनहित याचिका खर्चाला स्थायीची मंजूरी
काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण करण्यात आले होतं. मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होती. महापालिका निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त ७५ ते ८० जागांवरच विजय मिळण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. २०१४ पासून भाजपानं राज्यात ठिकठिकाणी पाय रोवण्यास सुरूवात केली होती. पुणे महापालिकेतही मागील निवडणुकीत घवघवीत यश भाजपानं संपादन केले होते.
नगरसेवकांची मज्जाच मज्जा; ऐन निवडणुकीच्या तोंडावर रखडलेली कामे मार्गी लागणार
पुणे महापालिकेत एकूण १६४ जागा असून त्यातील ९० हून अधिक जागा जिंकत भाजपाने बहुमत सिद्ध केले होते. महापालिकेत बहुमतासाठी ८४ नगरसेवकांची गरज आहे. परंतु एकट्या भाजपाने त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्याने सत्तेसाठी कुठल्याही पक्षाची मदत घेण्याची गरज भासली नाही. मात्र आता आलेल्या सर्वेक्षणातून भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून येते.
सत्ताधारी भाजप याहीवेळी आपटणार तोंडावर; जनहित याचिका खर्चाच्या अंमलबजापणीचे अधिकार आयुक्तांकडे
मुंबईनंतर पुणे महापालिका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर जागांचं गणितच मांडलं आहे. पुणे महापालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली होती. त्यातच राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी यांच्यासह शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कंबर कसली आहे. आगामी महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीच मुसंडी मारणार असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, भाजप बुडणार आणि राष्ट्रवादीची टीक-टीक वाजणार की महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे महापालिका पक्षीय बलाबल
भाजप ९९
काँग्रेस ०९
राष्ट्रवादी ४४
मनसे २
सेना ९
एमआयएम १
एकूण १६४
Read Also :
- जेव्हा अनिषा विचारते ‘मोदीजी, तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?’
- कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
- “मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव