मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनाच्या परिसरात झालेल्या राड्यानंतर, भाजप-शिवेसना कार्यकर्त्यांमध्ये वातावरण गरम झालेलं आहे. यातच आता, पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
बीडमध्ये भाजपला धक्का; प्रीतम मुंडेला डावलल्यामुळे तब्बल १४ जणांनी दिला राजीनामा
आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली, आज भाजपकडून १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ, शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये भिडत होण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सेनाभवन परिसरात जमत आहेत. तसेच, असंख्य शिवसैनिकांनी शिवसेना भवन परिसरात मोठी गर्दी केली आहे.
उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच, तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन आणि सभागृहाची शिस्त आणि नियम मोडण्यात आले. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांनी, भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं.
Read Also :
- “केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”
- सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!
- “मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
- भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
- जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस