अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा, राम मंदिर ट्रस्ट घोटाळा : सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
हे पण वाचा, ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
दरम्यान, यावरून आता विरोधकांनी भाजपला धारेवर धरले असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, ‘ट्रस्ट आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत खुलासा करावा. या प्रकरणामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली असून, मोहन भागवतांसोबचत, विश्व हिंदू परिषेदच्या नेत्यांनी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जे समोर आलं आहे त्यात तथ्य आहे की नाही, याचा खुलासा करणं गरजेचं आहे, अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा, ‘…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल’
हे पण वाचा, ‘रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी रचण्यात आलेले हे राजकीय षडयंत्र’, ट्रस्टने फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप
त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून उत्तर देण्यात आले असून, आमदार भातखळकर यांनी ट्विट करत, ‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!, असा जहाल शब्दांत सेनेला लक्ष्य केले आहे.
सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे.
ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
तसेच, ‘शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिरासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्या पैशांचा भ्रष्टाचार होणार असेल तर हे चुकीचे आहे,’ असे राऊत म्हणाले होते. यावर भातखळकरांनी, ‘शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे…लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही,’ असा हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेने आता 'हजरत टिपू'चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
Read Also :
- आता ओबीसी समाजही आक्रमक, छगन भुजबळांच्या निवासस्थानी ठरली आंदोलनाची दिशा
- सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा, म्हणजे बोलणाऱ्यांनाही गाडा…असं आहे ना.! – अजित पवार
- राष्ट्रवादीसमोर पेच; स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवार कुठून आणणार?
- “ती” यादी राज्यपालांकडेच, मात्र आता ही यादी देणे शक्य नाही
- ‘मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा, महाराष्ट्र इतर राज्यांपुढे हात पसरणार नाही’- राजेश टोपे