दिल्ली : भारतासह जगभरातील ४० देशांची सरकारांनी, राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर केला असल्याचे, ‘द वायर’ या वेबाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. यात इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या ‘पेगॅसस’ या हॅकिंग सॉफ्टवेअर द्वारे भारतातील पत्रकार, नेते, न्यायाधीश आणि उद्योगपतींचे फोन हॅक केल्याचं वृत्त, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांत सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० भारतीयांची केंद्र सरकारने जासूसी केल्याचा आरोप, विरोधकांनी मोदी सरकारवर केला असून, हॅकिंगद्वारे या सर्वांवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ३०० मध्ये ४० पेक्षा जास्त पेशाने पत्रकार असून, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
काय आहे ‘पेगॅसस’? सामान्यांसाठी उपलब्ध आहे का?
हे सॉफ्टवेअर फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. सामान्य नागरिकांना ते वापरण्यासाठी उपलब्ध नाही.
कसं काम करतं ‘पेगासस’?
ज्या व्यक्तीच्या फोनला हॅक करायचं आहे. त्या व्यक्तीच्या फोनमध्ये ‘पेगासस’ इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. यात जास्त करून, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. आणि जसं त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, सॉफ्टवेअर आपोआप इन्स्टॉल होतं.
व्हॉटस अपमध्येही इन्स्टॉल होतं?
हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन २०१९ मध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होत. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक बग शोधून काढून, त्याच्या आधारे नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. आणि एका कोडद्वारे या सॉफ्टवेअरला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.
पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं?
पेगासस इन्स्टॉल केल्यावर हॅकर्स, तुमच्या फोनला कमांड देऊन, फोनचं नियंत्रण मिळवतात आणि हवी ती माहिती मिळवतात. यात अनेक खाजगी गोष्टी असू शकतात. जसे की पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज इ. तसेच, ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात, फोनचा कॅमेरा, माईक वाटेल तेव्हा चालू करु शकतात.
पेगासस एवढं फेमस का आहे?
- कमी बँडविथवर काम करु शकतो. फोनची बॅटरी खात नाही. मेमरी, त्यातला डेटा संपवत नाही, त्यामुळे विनासंशय फोन हॅक होतो.
- अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित. iOS लाही हॅक करु शकतो.
- फोन लॉकचा फरक पडत नाही.
दरम्यान, विरोधकानीं केंद्र सरकारवर संशय व्यक्त करत, जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील केंद्रावर शंका व्यक्त केली आहे.
पेगाससच्या म्हणण्यानुसार ते आपलं सॉफ्टवेअर कुणाही ऐऱ्यागैऱ्याला विकत नाहीत. संबंधित देशाच्या मान्यताप्राप्त सरकारलाच विकतात.खुद्द भारत सरकारने ते विकत घेतलं आणि त्याचा वापर केला असा स्पष्ट निष्कर्ष निघतो.
ज्या ४० देशांनी ते घेतलंय त्यांची नावं सांगायला मात्र ते तयार नाहीत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 19, 2021
या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पेगासस कांड घडलं होतं का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या pic.twitter.com/0yux7h4PHp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 19, 2021
देशात पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपा शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 19, 2021
पेगॅसस हेरगिरी संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, “आम्हाला माहिती आहे की, ते काय वाचत आहेत. जे पण तुमच्या फोनमध्ये आहे”, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी पेगॅसस असा हॅशटॅग टाकला आहे.
We know what he’s been reading- everything on your phone!#Pegasus https://t.co/d6spyji5NA
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 19, 2021
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.
Read Also :
- “पंतप्रधान-गृहमंत्र्यांना दिलेली सुरक्षा अनावश्यक” म्हणणाऱ्या राऊतांची, चित्रा वाघ यांनी उडवली खिल्ली
- फडणवीसांनी खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
- पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’
- भाजप नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असा गनिमी कावा
- मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा