मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीचा ससेमिरा मागे लागलेले, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडी मोठी कारवाई करणार का, ही अनिश्चितता कायम असतानाच, आता उच्च न्यायालयाने ईडीला सरनाईक यांच्यासंबंधी आदेश दिले आहेत.
पेगासस प्रकरणावरून भाजप विरोधात दिल्लीत एकवटले, महाविकास आघाडीसह सगळे विरोधक
“सरनाईक यांच्यावर तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करु नका,” असे न्यायालयाने ईडीला सांगितले आहे. त्यामुळे सरनाईक आणि कुटुंबीयांना आता २३ ऑगस्टपर्यंत दिलासा मिळालेला आहे. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जमादार यांच्या खंडपीठानं हा आदेश सुनावला आहे. त्यांनी हा निर्णय सुनावताना, “सध्याच्या व्यस्त वेळापत्रकात यावर सुनावणी घेणं शक्य नाही,” असं म्हटलं आहे.