मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात, तसेच १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ईडीने त्यांना अनेकदा नोटीस बजावून देखील त्यांनी, आरोग्याची आणि इतर काही कारणे देत चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर त्यांनी ईडीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, याचिकांच्या माध्यमातून काही मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
न्यायालयाने असे करताना म्हटले आहे; की कायदेशीर उपाय फक्त कायदेशीर तरतुदींनुसारच करता येतात. त्यामुळे, इतर उपलब्ध पर्यांयाचा देशमुखांनी वापर करावा. त्यांनी रीतसर अटकपुर्व जामीनाठी कोर्टात याचिका करावी. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार इतर मुभा मिळवण्यास त्यांना स्वातंत्र्य आहेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाल्याचे सांगितले जात आहे.
Supreme Court DECLINES to grant any interim relief to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh in his plea seeking protection from any coercive action in a money laundering case registered by the ED. Says remedies in law open#supremecourt @dir_ed @AnilDeshmukhNCP https://t.co/AtS9NmhLJq
— Bar & Bench (@barandbench) August 16, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता, ज्याच्या आधारे सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने देशमुख आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या ४.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आणि चौकशीसाठी देशमुख पिता-पुत्रांना ४ ससमन्स बजावले. दुसरीकडे ईडीने देशमुखांच्या नागपुरातील अनेक मालमत्तांवर छापे टाकून झडती घेतली आहे.
“जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका
सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. ए. एम. खानविलकर, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्येष्ठ विधीज्ञ विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यामुळे, अनिल देशमुखांच्या भोवती असलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आणखीनच आवळला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
Read Also :
- “…तेव्हा मी त्यांना उत्तरे देईन,” भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खासदार भावना गवळींचे किरीट सोमैयांना आव्हान
- लायकीत राहा! नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करून टाकू, मनसेचा प्रवीण गायकवाडांना इशारा
- “मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात, मंत्री भागवत कराडांसमोर मुंडे समर्थकांचा गोंधळ
- ‘औरंगाबाद’चे नामकरण लवकरच ‘संभाजीनगर’ होणार? शिवसेना नेत्याचे मोठे विधान