मुंबई : : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना मुंबई सत्र न्यायालयकडून दोषमुक्त करार करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ‘सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं,’ अश्या अंदाजात त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही आणि कुणावरही लोभ नाही,’ असंही ते म्हणाले.
ईडीच्या कारवाईवर प्रताप सरनाईक यांनी दिला, पुन्हा ठाकरे सरकारला घरचा आहेर
दरम्यान, आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘सरळ वागता की तुमचा भुजबळ करू, असं विरोधक म्हणत होते. आता मी सुटल्यानांतर त्यांना ही धमकी देता येणार नाही’ असं ते म्हणाले. तसेच, ‘जनतेच्या आशीर्वादामुळे माझी आणि समीर, पंकज आमच्या सगळ्यांची यातून निर्दोष मुक्तता झाली. मी तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना अनेक त्रासाला तोंड द्यावे लागले. माझ्यामुळे, खाली पहावं लागलं,’ अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
कोर्टाच्या दिलासादायक निर्णयांनंतर भुजबळांनी, शायराना अंदाजात दिली पहिली प्रतिक्रिया
तसेच, भुजबळांना अटक करू नका! या मागणीसाठी तेव्हा नाशिक मध्ये भव्य असा मोर्चा निघाला होता. त्यात लहान-ज्येष्ठ, महिला-पुरुष, तरुण-लहान मुलं सगळे सामील झाले होते. त्यावेळी पोलिसांच्या आकड्यानुसार त्यात १२ ते १५ लाख लोक उपस्थित होते, असं सांगितलं गेलं. माझ्या अटकेमुळे माझ्या अनेक सहकार्यांना दुःख झालं. त्यामुळे माझी मुक्तता महत्वाची आहे. तेव्हाही मी लोकांच्या हृदयात होतो, तो आजही आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
…तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल; अजित पवारांच महत्त्वपुर्ण विधान
‘माझ्या पाठीमागे उभे असलेले लोक बघून, त्यांचे आशीर्वाद बघून मला या प्रसंगात लढायला मोठे बळ मिळाले. तुरुंगातून बाहेर आल्यावर मी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली, लोकसभा, विधानसभेत जे व्हायचं ते झालं. आम्ही जनतेसमोर खरं काय ते मांडलं, काही लोक दुखावलेत, पण जनतेचं आमच्यावरचं प्रेम कमी झालं नाही,’ असं म्हणत, ‘राजकारणात प्रहार अंगावर घेण्याची ताकद हवी असते, आमच्यामागे इडी, सीबीआय यंत्रणा लावल्या जात आहेत. सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा हल्लाबोल त्यांनी केंद्रावर केला.
Read Also :
- …त्यामुळे अण्णा पुन्हा उपोषणाला बसणार, दिला महाविकास आघाडीला सरकाला इशारा
- राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्येसभेवर संधी की विधानसभेची उमेदवारी? तर्कवितर्कांना उधान
- ‘दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय,’ फडणवीसांचा आरोप
- पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय निकम यांच्यावर तात्काळ कारवाई करा – गुणरत्न सदावर्ते
- ‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा