पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेनुसार २०२२ मध्ये असून, महामारीच्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी राजकीय पक्षांनी आपापल्या परीने या निवडणुकीची तयारी सुरु केली असून, सध्या महापालिकेची सत्ता हातात असलेल्या भाजपने देखील आपले डाव रचायला सुरुवात केली आहे.
महापालिकेचा सध्याच्या नगरसेवकांचा पदकाळ २०२२ च्या १५ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे, जानेवारी अखेरीस पुणे महापालिकेची निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. मात्र, ही निवडणूक भाजप कुणाच्या नेतृत्त्वाखाली लढणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते आणि यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा करून, या सर्व शक्यतांवर पडदा पाडला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज, दिव्यांग तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना, घरपोच जाऊन लस देण्याच्या उपक्रमाची सुरुवात कसबा विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी त्यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात गिरीश बापट हेच कारभारी असतील, यावर शिक्कामोर्तब केले आहे. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे आणि स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.
Read Also :
- ‘दुधापेक्षा पाणी महाग’; दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत थेट मंत्रालयाकडे
- ‘‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो हे लक्षात असू दे.’’ – भाजप
- गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा
- ‘भाजप अगदी ‘दूध के धुली’ आहे, त्यांना जे भुंकायचं आहे ते भुंकू देत’ – शिवसेना
- पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस; प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? कुणालाच ठाऊक नाही