पुणे : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची १५ ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांकडे ४ मागण्यांचे निवेदन सादर केले असून, ही भेट पुण्यातल्या राजभवनात झाली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चाही केली.
हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा
या ४ मागण्यांमध्ये, MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे, ११ वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चित असे धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश देणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे आणि पूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सक्तीने केली जाणारी वीज तोडणी थांबवणे, याबाबत त्यांनी राज्यपालांकडे मागण्या सादर केल्या आहेत.
शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी, त्यांनी शहा यांच्याशी सहकार तसेच इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली. तसेच, या दोन्ही नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार केला. महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या या थेट भेटीने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.
“मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते राजभवनात परिसरात ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपालांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. यावेळी त्यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली. त्यानंतर आज ते सिंहगड किल्ल्याचा दौरा करणार असून, मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर राज्यपाल आहेत.
Read Also :
- ताकद पहायची असेल तर दत्तात्रय भरणेंनी उजनी धरण ओलांडून दाखवाव – शिवसेनेने दिला दम
- “शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
- गडकरींच्या स्फोटक पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत, पोलीस महासंचालक दिले महत्त्वाचे आदेश
- “मुख्यमंत्री मरू द्या”, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली
- १२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले