पुणे : देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. त्यामुळे भारताने कोरोना लसीचा १०० कोटी डोसचा आकडा पार करून इतिहास रचला आहे. देशातील १०० कोटीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार दोन पाय घट्ट करून मैदानात उभे असतानाच भाजप सदस्य आणि समाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर यांच्या सोशल वेलफेअरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने आज २५०० लसीकरणाचा टप्पा पार करत सरकारच्या मोहीतमेत भर घातली आहे. नरेंद्र मोदींच्या छात्रछायेखाली बालवडकरांनी २५०० टप्पा पार करत राज्यातील लोकप्रतिनिधींसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्यावर सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे.
बालेवाडीत आयएएस योगेश पाटलांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर; लहु बालवडकर सोशल वेलफेअरचा स्त्युत्य उपक्रम
भाजप सरकारच्या कोविन अॅपनुसार सध्या भारतात ७४ हजार २३४ सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये ७१ हजार ६४६ सरकारी आणि २ हजार ५८८ खाजगी केंद्र आहेत. त्यातील एक म्हणजे बाळासाहेब देवरास पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिटयूट, PPCR, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान, फर्स्ट एड पॉलिक्लिनिक आणि सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने लहु बालवडकर यांच्या पुण्यातील बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात मोफत लसीकरण महाअभियान सुरु करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेत २५०० लसीकऱणाचा टप्पा पुर्ण झाला आहे.
बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना धमकी
सामाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर हे सोशल वेलफेअरच्या माध्यमातून संकटकालीन परिस्थितीत गरिब आणि गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. त्यामध्ये आरोग्य, अन्नधान्य यांसह आर्थिक समस्यांनाही हातभार लावतात. त्यातच एकीकडे केंद्रातील भाजप सरकार १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण करत असतानाच लहु बालवडकर यांनी बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील २५०० नागरिकांचे लसीकरण करून लोकप्रतिनिधीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यामुळे बालवडकर यांच्या लसीकरण मोहीमेचे सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या लसीकरण मोहिमेत मोलाची साथ देणाऱ्या नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांचा लहु गजानन बालवडकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी या मोफत लसीकरण मोहिमेत बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपल्या देशाला, आपल्या शहरला, आपल्या परिसराला कोरोना महामारीमुक्त करावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे या वेळी भाजपा सदस्य व लसीकरण मोहिमेचे आयोजक लहु बालवडकर यांनी आपले मत व्यक्त केले.
Read Also :
- जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय – चित्रा वाघ
- समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या; जीवाला धोका असल्याचा पत्नीचा दावा
- अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
- समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय? – नवाब मलिक
- पुणे महापालिकेत लोकसंख्येनिहाय नगरसेवकांची संख्या ठरणार? 166 ऐवजी 183 उमेदवार असणार!