मुंबई : देशात महामारीने लोकांचे जीव जात आहेत. आरोग्य सुविधांवाचून त्यांचा श्वास टांगणीला लागलेला आहे, मात्र असे असतानाही केंद्र सरकार आपल्याच महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात मग्न आहे. देश दुःखात असताना केंद्र सरकार आणि मंत्री आपलीच प्रतिमा उदात्त करत, महामारीसाठी केंद्र सरकारकडूनच सर्वात जास्त प्रयत्न होत असल्याचे चित्र उभे करत आहेत, अशी टीका विरोधकांकडून मोदी सरकारवर सातत्याने केल्या जात आहेत.
दरम्यान, राज्यात देखील सत्ताधारी आघाडी सरकारवर, महामारी व्यवस्थापनाचे अस्ताव्यस्त नियोजन केल्यावरून विरोधकांकडून टीका केली जात असून, भाजपचे आमदार आणि मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी, राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “नर्स, डॉक्टर, एसटी कामगारांचे पगार देण्यासाठी ठाकरे सरकारकडे पैसे नाहीत PR साठी मात्र आहेत. जनतेच्या टॅक्सचा पैसा ठाकरे सरकारमधील अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली तोंडे चमकवण्यासाठी होतोय,” असा त्यांनी आरोप केला आहे.
जनतेच्या टॅक्सचा पैसा ठाकरे सरकारमधील अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली तोंडे चमकवण्यासाठी होतोय… pic.twitter.com/VaHJq2KdM8
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 13, 2021
तसेच, “लसीसाठी पैसा नाही, फक्त PR आणि टक्केवारीची टेंडर काढायला ठाकरे सरकारकडे पैसा आहे. असलेले पैसे जनतेचे जीव वाचवण्यासाठी खर्च करायचे नाहीत, फक्त प्रसिद्धीवर करायचे हे धोरण असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण थांबवण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. सरकारला लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही…,” असा हल्लबोल त्यांनी केला आहे.
लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल. pic.twitter.com/Uyk5fgtGaP— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 13, 2021
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल,” असा घणाघात करत त्यांनी, “अहो शिवराज सिंह जी अनाथांना कसले पैसे वाटतायत, महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, PR आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा… अधिक माहितीसाठी सम्पर्क राज्याचे बेस्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री…अशी खोचक टीका देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केली आहे.
अहो शिवराज सिंह जी अनाथांना कसले पैसे वाटतायत, महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, PR आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा…
अधिक माहितीसाठी सम्पर्क राज्याचे बेस्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री… https://t.co/5jFAYBkOXu— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 13, 2021
Read Also :
- ‘ठाकरे सरकारचा अनलॉकबाबत ठोस ‘एक्झिट प्लॅन’ काय?’
- ‘स्वतःच्या कौतुकाची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचे न्यायालयानेच वाभाडे काढले’
- ‘पटोले हे विनोदी कलावंत, त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही’
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बदलीला ब्रेक, मॅटकडून स्थगिती
- ‘राजेश टोपेंचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’