नाशिक : नाशिक नोट प्रेस, ही अत्यंत हाय सिक्युरिटी असलेल्या सरकारच्या संस्थांपैकी पैकी एक म्हणून ओळखली जाते. अशा करन्सी नोट प्रेसमधून ५ लाखांची मोठी रक्कम, अचानक गहाळ झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या गहाळ नोटांमध्ये ५०० रुपयांचे एकूण १० बंडल, म्हणजे ५ लाख रुपायांची रक्कम होती. या प्रकरणाचा आता उलगडा पोलिसांकडून झाला असून, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी यशाबाबत माहिती दिली आहे.
पुणे महानगर नियोजन समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलली; विकास आराखडा लांबणीवर
“२ फेब्रुवारी पासून हे बंडल गहाळ झाले होते. अंतर्गत व्यवस्थापनाने ६ महिने तपास करून देखील माहिती मिळत नसल्याने, त्यांनी १३ जुलैला आमच्याकडे याची तक्रार दाखल होती. प्रेसच्या व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशीचा अहवालही आम्हाला दिला होता. यांनतर संबंधित विभागातील अधिकारी आणि कामगारांची आधी चौकशी आम्ही चौकशी केली, परंतु काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर आम्ही नोटा छपाईची सर्व प्रक्रिया जाणून घेतली,” असं त्यांनी सांगितलं.
मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा
यांनतर, “गहाळ झालेला हा बंडल सर्वांत शेवटी कोणी पहिला, याची आंम्ही माहिती घेतली. कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकार्ड तपासले. त्यात, १२ फेब्रुवारीला तपासनीसाकडून तपासला गेल्याचे दिसले आणि नंतर पार्सल फोडून तपासणी केली असता, त्या ठिकाणी दुसराच बंडल तपासल्याचे दिसून आले. या ठिकाणीची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे अशक्य होते. अखेर, रेकार्ड तपासल्यावर कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला,” अशी माहिती त्यांनी दिली.
आघाडी सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त, पूरग्रस्तांना सोडले वाऱ्यावर ; पडळकर यांची खोचक टीका
“त्यांनी माहिती सांगण्यासाठी वेळ मागितला. मात्र, कारवाईच्या भितीने त्यांनी शनिवारी स्वतःहून व्यवस्थापनाकडे कबुली जबाब दिला. यात, हा बंडल चोरीला गेलेला नसून, कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला आणि व्यवस्थापकीय कारवाईच्या भितीने ही बाब लपवण्यात आली, असे सांगितले. याची लेखी कबुली त्यांनी पत्राद्वारे या दोघांनी मुद्रणालय व्यवस्थापनाला दिली असून, आपली चुक मान्य केली आहे. त्यामुळे इथे कोणताही चोरीचा प्रकार झाला नसून, सुरक्षा यंत्रणा अत्यंत सक्षम असल्याचेच पुन्हा सिद्ध झाले आहे.
Read Also :
- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: आरोपी जामिनावर बाहेर आले तरी वनविभागाची चौकशी संपेना
- अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र संकटात, नवी मुंबई महापालिकेने १ कोटी रुपयांची मदत करावी – आमदार मंदा म्हात्रे
- थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले
- राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; पण एका मतदारसंघासाठी केवळ एकच तास
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!