दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात काल, पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी बैठक झाली. तब्बल ४ तास ही बैठक चालली. यांनतर आज, पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठकदेखील, ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीआधी झाली असून, या बैठकीला केरळमधील राष्ट्रवादीचे नेते पी. सी. चाको, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते.
हे पण वाचा, हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, आज दु. ४ वा. पवारांच्या निवासस्थानी या ‘राष्ट्रमंच’ आघाडीच्या दृष्टीने एक महत्वाची बैठक सुरु होती. ही बैठक तब्ब्ल दोन तास सुरु होती. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, “शरद पवारांनी ही बैठक बोलावली नसून, ती त्यांच्या निवासस्थानी झाली आहे. ‘राष्ट्रमंच’ च्या समविचारी पक्षांशी चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. यात काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा, मनोज तिवारी, कपिल सिब्बल, सिंघवी या नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं. मात्र काही कारणाने ते येऊ शकले नाहीत.
Delhi: TMC leader Yashwant Sinha, Lyricist Javed Akhtar, Rashtriya Lokdal President Jayant Chaudhary and National Conference leader Omar Abdullah arrive at the residence of NCP chief Sharad Pawar. pic.twitter.com/ThoG8Y04G5
— ANI (@ANI) June 22, 2021
त्यामुळे, काँग्रेसला यातून वगळण्यात आलेलं आहे, या बाहेर सुरु असलेल्या चर्चांना काही अर्थ नाही. या बैठकीत देशातील राजकीय, सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. या बैठकीत केवळ राजकीय नेतेच नव्हते, विविध क्षेत्रातील दिग्गज होते. त्यामुळे केवळ राजकीय रुप देणं योग्य नाही” असं माजिद मेमन यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा, “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
तसेच, “समाजवादी पक्षाचे नेते आणि राष्ट्रमंचचे संस्थापक सदस्य घनश्याम तिवारी यांनी, “देशात अलटर्नेट व्हिजन तयार करणं गरजेचं आहे. आज बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. यशवंत सिन्हा यादृष्टीने एक टीम तयार करतील. ती टीम देशाला एक व्हिजन देत राहील. यात देशातील सर्व स्तरातील सामान्य लोकांचा समावेश असेल. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकरी, इंधन, केंद्र-राज्य संबंधं इ. अनेक मुद्द्यांवर ही टीम काम करेल,” असं सांगितलं.
A meeting of the National Executive Committee of our Nationalist Congress Party was held in New Delhi today.
In this meeting, I had a detailed discussion with my committee members on our future policies, our role in the next Lok Sabha elections and current national issues. pic.twitter.com/tNiDPJK2Jg— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 22, 2021
हे पण वाचा, आम्ही स्वबळावर लढू, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी; शुभेच्छा!!
भाजप पक्षातून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के. टी. एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच, या राजकीय नेत्यांव्यतिरिक्त या बैठकीमध्ये लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमधील भारताचे निवृत्त राजदूत के. सी. सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितिश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित आहेत.
Read Also :
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाना पटोलेंवर नाराज? आघाडीत अस्वस्थता वाढली!
- विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
- खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
- उच्च न्यायालायने पोलीस आयुक्तांना दिले, संजय राऊत यांच्या चौकशीचे आदेश
- महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका