शिर्डी: सोलापूर जिल्ह्यातील उजनी पाणी वाटपाच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरुद्ध सोलापूरकरांनी जनआक्रोश केल्याने घेतलेला निर्णय रद्द करावा लागला होता. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा प्रश पुन्हा एकदा उफळून आला. त्यातच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील डाव्या कालव्याची आणि त्यावरील आढळा धरणावर बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहणी केली. कोरोना महामारीच्या काळात हा कार्यक्रम होत असल्याने जास्त गर्दी न करण्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आदेश होते. कार्यक्रमास शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे यांना बोलविले नसल्याने ते कमालीचे संतापले. शिवसेनेचे खासदार सदाशीव लोखंडे यांनी या दौऱ्यावर आक्षेप घेत मंत्र्यासह तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Shiv Sena Shirdi MP Sadashiv Lokhande demands to file charges against Jayant Patil and two other minister
राज्यात जमावबंदी असूनही कार्यक्रम घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांनीच आदेशाचा भंग केल्याने त्यांच्यावरही कार्यवाही करत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशीव लोखंडे यांनी केली आहे. या संदर्भात कार्यक्रमावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे पत्र खासदार लोखंडे यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे दिले आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना पक्षाचे खासदार असूनही लोखंडे यांना मात्र टाळण्यात आले आहे.
दरम्यान गेल्याच महिन्यात राहता तालुक्यात खासदार सदाशिव लोखंडे हे कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनीही जमावबंदी आदेश मोडल्याचा गुन्हा दाखवल करण्यात आला होता .जिल्ह्यातील खासदार आमदारांना एक न्याय आणि बाहेरून आलेल्या मंत्र्यांना दुसरा न्याय? असा संतप्त सवाल देखील लोखंडे यांनी पोलीस प्रशासनाला विचारला आहे. सध्याला कोरोनाची महामारी असल्याने कार्यक्रमांवर बंधन घातले आहे. तरी देखील मंत्र्यांच्या उपस्थिती असे कार्यक्रम होतातच कसे असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.
गेल्या महिन्यात शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता
कोरोना काळातील जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल होता. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्कऑर्डर झाली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार लोंखडे सह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सदस्यही यावेळी हजर होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.