मुंबई : देशात एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून, दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने, केंद्र सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री समाज माध्यमांवर व्यक्त होत असून, अभिनेत्री स्वरा भास्करने देखील नुकतेच एक ट्विट केले आहे. स्वराच्या या ट्विटची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू असून, शेखर गुप्ता यांच्या ट्विटला तिने रिट्विट करत एक ट्विट केले आहे.
India needs a new PM.
Unless Indians want to see their loved ones perish gasping for breath! https://t.co/FBsmJIhDwA— Swara Bhasker (@ReallySwara) May 5, 2021
“जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल की देशाने पुढे जावे, तर त्यांना नवीन टीमची गरज आहे.’ असे ट्विट शेखर गुप्ता यांनी केले होते, या ट्विटला रिप्लाय देत स्वराने, “आपल्या प्रियजनांना जर श्वासासाठी तडफडताना बघायचं नसेल, तर देशाला नव्या पंतप्रधानची गरज आहे.’ असे ट्विट केले आहे. स्वराचे हे ट्विट समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे, सोबतच या ट्विटला रिप्लाय करून अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.