कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली असून, यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित होते.
यावेळी, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी ही केंद्राचीच असली, तरी आघाडी सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी, त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व मागण्यांना तातडीने मान्यता द्यावी,’ अशी आग्रही भूमिका श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तसेच, त्यांनी छत्रपती संभाजीराजेंनी आघाडी सरकारकडे केलेल्या ५ मागण्यांचा देखील यावेळी पुनरुच्चार केला असून, ‘केंद्राकडे बोट दाखवून आघाडी सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही, राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या हेतूने, त्यांना सक्षम करण्याची आणि स्वायत्तता देण्यासाठी जी राज्य सरकार जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडावी,’ अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्र्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले असले तरी, संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवर शाहू छत्रपती यांची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठीच ते न्यू पॅलेसवर गेले असल्याची चर्चा आहे. इथे या दोघांमध्ये तासभर मराठा आरक्षणावर चर्चा असून, यावेळी मालोजीराजे, मुधरिमाराजे हे देखील उपस्थित होते.
Read Also :
- दोन डोस घेतले तरच ‘वारकऱ्यांना’ पंढरपुरात मिळणार प्रवेश
- आगामी निवडणूका शिवसेना आणि काँग्रेससोबत लढणार का? राष्ट्रवादी म्हणते…
- आरक्षणप्रश्नी उदयनराजे आणि संभाजीराजेंची आज पुण्यात भेट! भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता; १३ आमदार पक्ष सोडणार?
- अजित पवार-छत्रपती शाहूंची लक्षवेधी भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण